या 4 कारणांमुळे युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतही असणार मुंबई इंडियन्सचा डंका.
|
1/ 11
जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली.
2/ 11
मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती.
3/ 11
मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.
4/ 11
यादरम्यान 60 सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे. पटेल पुढे म्हणाले की – अबू दाबी, दुबई, शारजाह ही तीन मुख्य ठिकाणं असणार आहे. सरकारच्या परवानगीनंतर लीगचा संपूर्ण प्लान आखण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
5/ 11
मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएल 2020मधील सर्वात मजबूत संघ आहे. आतापर्यंत एकूण 4 वेळा मुंबईने विजेतेपद पटकावले आहे. मुंबईच्या विजयामागे सर्वात मोठा हात आहे तो शानदार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माचा.
6/ 11
मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामने खेळले आहेत. 4 वेळा त्यांना आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या विजयामागे चार प्रमुख कारणे आहेत.
7/ 11
मुंबई इंडियन्स संघाकडे शानदार गोलंदाजांची टीम आहे. जलद गोलंदाजाची आयपीएलमधील सर्वोत्तम टीम मुंबईकडे आहे. मुंबईकडे जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कुल्टर नाईल,मिशेल मॅक्लेनाघन यांसारखी शानदार टीम आहे. त्यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं चेन्नईला नमवलं होतं.
8/ 11
विदेशी खेळाडूंबाबत बोलाचये झाल्यास, मुंबईकडे मोठी फळी आहे. लसिथ मलिंगा, कुल्टर नाईल, क्रिस लिन, क्विंटन डी कॉक आणि कायरन पोलार्ड यांसारखे विदेशी खेळाडू आहेत.
9/ 11
तर, अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक, सूर्य कुमार यादव आणि कृणाल पांड्या सारखे मजबूत खेळाडू आहेत. मुंबई इंडियन्सकडे युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांची चांगली टीम आहे.
10/ 11
भारतीय क्रिकेट टीमचा भार हा रोहित शर्मावर जास्त आहे. याव्यतिरिक्त या टीममध्ये क्विंटन डी कॉक, क्रिस लिन सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन सारखे दर्जेदार फलंदाजही आहेत.
11/ 11
मुंबई इंडियन्स आतापर्यंत 4 वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. आता 5वा आयपीएल किताब हा संघातील अष्टपैलू खेळाडूंवर आहे. टीममधील क्रुणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि केरोन पोलार्डसारख्या अनुभवी खेळाडूंमुळं मुंबईने अनेक सामने जिंकले आहे. त्यामुळं आता याच खेळाडूंवर मुंबईच्या विजेतेपदाची मदार आहे.