

यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार आहे. 19 सप्टेंबरला पहिला सामना होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.


क्रिकेटच्या दुनियेत बेस्ट चेसर म्हणून विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची ओळख आहे. या दोन दिग्गजांनी एकदिवसी, टी-20 क्रिकेटमध्ये आपला दबादबा निर्माण केला. मात्र आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी विराट आणि धोनीला मागे टाकले आहे.


तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र आयपीएलमध्ये बेस्ट चेसरच्या रेसमध्ये विराट आणि धोनी पहिल्या पाचमध्येही नाही आहेत. या लिस्टमध्ये 4 विदेशी आण एक भारतीय खेळाडूचा समावेश आहे.


राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. बटलरनं 40.45च्या सरासरीनं चेस केले आहेत. बटलर मधल्या फळीत फलंदाजी करतो, याशिवाय मोठे शॉट खेळणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे.


ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आणि किंग्ज इलेव्हनचा स्टार खेळाडू शॉन मार्श या यादीच चौथ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात मार्शनं सर्वात जास्त धावा केल्या होत्या. मार्शनं आयपीएलमध्ये 42.20 सरासरीनं चेस केले आहे.


ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लक्ष्यचा पाठलाग करताना वॉर्नर 43.16च्या सरासरीनं फलंदाजी करतो. गेल्या हंगामात वॉर्नरनं सगळ्यात जास्त धावा करत ऑरेंज कॅपही जिंकली होती.


किंग्ज इलेव्हन पंजाबचा माजी फलंदाज डेव्हिड मिलर याआधी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिलरनं आव्हानाचा पाठलाग करताना 46.77च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. एका ओव्हरमध्ये मॅचचं रुप पालटणारा फलंदाज म्हणून मिलर ओळखला जातो. या आयपीएलमध्ये मिलर राजस्थानच्या संघात आहे.