

आयपीएल (IPL 2020) च्या ग्रुप स्टेजच्या सगळ्या मॅच संपल्यामुळे आता प्ले-ऑफचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बँगलोर या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. लीग स्टेजमध्ये दिग्गजांपेक्षा युवा खेळाडूंच्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले.


रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा युवा सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कलनं या हंगामात 14 सामन्यात 33.71च्या सरासरीनं 472 धावा केल्या. पहिल्यांदाच आयपीएल खेळत असलेल्या पडिक्कलनं RCBकडून सर्वात जास्त धावा केल्या आहेत. पदार्पणातच 400 पेक्षा जास्त धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.


सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चेत आलेला फलंदाज आहे. कामगिरीत सातत्य असूनही सूर्यकुमारला भारतीय संघात जागा मिळाली नाही आहे. त्यानं 14 सामन्यात 41च्या सरासरीनं 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं 410 धावा केल्या आहेत.


हैदराबादचा संघ दरवर्षी युवा खेळाडूंना संधी देतं. यावर्षी टी नटराजन या खेळाडू त्यांच्यासाठी हुकुमी एक्का ठरला. शानदार यॉर्करनं त्यानं दिग्गजांना हैराण केलं. 14 सामन्यात नटराजननं 31.35च्या सरासरीनं धावा देत 14 विकेट घेतल्या.