

सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)ने मंगळवारी अधिकृतरित्या भुवनेश्वर कुमार संपूर्ण मोसम खेळू शकणार नाही, अशी घोषणा केली आहे. भुवनेश्वरच्या ऐवजी हैदराबादने त्याच्या बदली खेळाडूचं नावही जाहीर केलं आहे. (SRH)


मागच्या शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)विरुद्धच्या मॅचमध्ये शेवटची ओव्हर टाकताना भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमार खेळला नव्हता. या मॅचमध्ये हैदराबादला पराभवाचा धक्का बसला होता. ( फोटो- @BhuviOfficial)


हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)साठी खेळलेल्या आंध्र प्रदेशच्या पृथ्वी राज यारा याची भुवनेश्वरच्या जागी निवड केली आहे. 22 वर्षांच्या पृथ्वी राज याने आतापर्यंत 3 टी-20 मॅच खेळल्या आहेत. यातल्या 2 मॅच त्याने मागच्या वर्षी कोलकात्याकडून खेळल्या. (IPL)