Home » photogallery » sport » IPL 2020 SRH ALL ROUNDER VIJAY SHANKA RULED OUT OF TOURNAMENT DUE TO HAMSTRING INJURY MHJB
IPL 2020: RCB विरुद्धच्या सामन्याआधी हैदराबादला मोठा झटका, हा अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर
हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला (Vijay Shankar) ला दिल्ली कॅपिटलविरोधातील सामन्यात दुखापत झाल्यामुळे तो आता आयपीएलबाहेर झाला आहे.
|
1/ 5
सनराइजर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याने टीमसमोरील आव्हान वाढले आहे. मिचेल मार्श आणि भुवनेश्वर कुमार बाहेर गेल्यानंतर हैदराबादला आणखी एक झटका मिळाला आहे.
2/ 5
टीममधील स्टार ऑलराउंडर विजय शंकर (Vijay Shankar) टीममधून बाहेर गेला आहे. हॅमस्ट्रिंग इन्ज्यूरीमुळे विजय शंकर पूर्ण आयपीएलमधून बाहेर गेला आहे.
3/ 5
सनरायजर्स हैदराबादने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाही आहे. दिल्लीविरुद्ध दुसरी ओव्हर टाकताना त्याला दुखापत झाली, तो केवळ 1.5 बॉल टाकू शकला. शेवटचा बॉल टाकण्यासाठी डेव्हिड वॉर्नरला यावं लागलं.
4/ 5
याआधी चेन्नई सुपर किंग्स (CSK vs SRH) विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर दुखापतग्रस्त झाला. फिजीओंच्या उपचारानंतरही तीन वेळा त्याने ओव्हर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आले. त्यानंतर भुवनेश्वर टूर्नामेंटबाहेर झाला. हा हैदराबादसाठी मोठा झटका होता
5/ 5
त्याचप्रमाणे टीममधील ऑलराउंडर मार्श आरसीबी विरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे 23 सप्टेंबररोजीच आयपीएलमधून बाहेर झाला आहे.