आयपीएल (IPL 2020)ची यंदाची स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. युएईतल्या शारजाह, अबु धाबी आणि दुबई या तीन शहरांमधल्या स्टेडियममध्ये आयपीएलच्या मॅच होत आहेत. कोरोनामुळे बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे, त्यामुळे खेळाडू उत्साहात आहेत. पण त्यांना युएईमधल्या गरमीमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण युएईमधली या गरमीचा शाहरुख खानला त्रास होत नाही, असं म्हणावं लागेल.
युएईमधल्या गरमीचा सामना करण्यासाठी खेळाडू आईस पॅक, ओला टॉवेल, ज्युस यांची मदत घेत आहेत. बँगलोरचा लेग स्पिनर ऍडम झम्पा या उन्हाळ्यामुळे आजारी पडला आहे. पण केकेआरचा मालक शाहरुख खान स्टेडियममध्ये थंडीत घालायची टोपी आणि जॅकेट घालून पोहोचला. पंजाब आणि केकेआरमध्ये झालेला हा मुकाबला पाहण्यासाठी शाहरुख आला होता. यावेळी शाहरुखने पर्पल रंगाची टोपी आणि पांढऱ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं.