IPL 2020 : फॉर्मसाठी संघर्ष, तरी ऋषभ पंतने केला विक्रम
यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मोसमात खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या ऋषभ पंत (Rishabh Pant) ने विक्रम केला आहे.
|
1/ 4
आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात ऋषभ पंत फारसा फॉर्ममध्ये नाही. दुखापतीमुळे त्याला काही मॅचमध्ये खेळताही आलं नाही. पण संघर्ष करत असलेल्या ऋषभ पंतने कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये नवा विक्रम केला आहे.
2/ 4
ऋषभ पंत (Rishabh Pant)ने आयपीएलमध्ये 100 सिक्स पूर्ण केले आहेत. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगवर पाचव्या ओव्हरला पंतने स्कूप शॉट खेळून सिक्स लगावला. हा सिक्स पंतचा आयपीएलमधला 100वा सिक्स होता.
3/ 4
ऋषभ पंत आयपीएलमध्ये सगळ्यात जलद 100 सिक्सपर्यंत पोहोचणारा भारतीय ठरला आहे. पंतने 100 सिक्स साठी 1,224 बॉल खेळले. याआधी हा विक्रम युसुफ पठाणच्या नावावर होता. युसुफने 1,308 बॉलमध्ये 100 सिक्स पूर्ण केले होते.
4/ 4
दिल्लीकडून 100 सिक्स लगावणारा पंत हा पहिलाच खेळाडू आहे. याआधी सेहवागने दिल्लीकडून खेळताना 85 सिक्स मारले होते.