Home » photogallery » sport » IPL 2020 RCB VS RR CHRIS MORRIS TOOK 9 WICKETS IN 4 MATCH FROM ROYAL CHALLENGERS BANGLORE MHPG
IPL 2020 RCB vs RR: वय वर्ष 33 विकेट 9! IPL गाजवतोय 10 कोटींना विकत घेतलेला 'हा' वयस्कर गोलंदाज
आयपीएलच्या तेराव्या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
|
1/ 6
आयपीएलच्या तेराव्या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गेल्या हंगामात तळाला असणारा हा संघ यावेळी प्ले ऑफ गाठणार हे निश्चित आहे. शनिवारी राजस्थान विरुद्ध झालेला सामना RCBनं 7 विकेटनं जिंकला.
2/ 6
दरम्यान, RCB कडून 33 वर्षीय गोलंदाज क्रिस मॉरिस या हंगामात जबरदस्त गोलंदाजी करत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मॉरिसनं 26 धावा देत 4 विकेट घेतल्या.
3/ 6
मॉरिसला RCB नं 10 कोटींनी आयपीएल लिलावात विकत घेतले होते. मात्र मॉरिस सुरुवातीचे सामने खेळू शकला नव्हता. आयपीएलमधला 25वा सामना मॉरिसचा पहिला सामना होता.
4/ 6
मॉरिसनं चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएलमधला पहिला सामना खेळला होता. या सामन्यात त्यानं 19 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या.
5/ 6
KKR विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात मॉरिसनं 17 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. तर, तिसरा सामना पंजाबविरुद्ध खेळला. मात्र या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्यानं फलंदाजीमध्ये नाबाद 25 धावांची खेळी केली.
6/ 6
मॉरिसनं आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ 4 सामने खेळले आहेत. मात्र या 9 सामन्यात त्यानं 9 विकेट घेतल्या आहेत.