आयपीएल (IPL)म्हणलं की चाहत्यांच्या समोर सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे फोर आणि सिक्सचा वर्षाव, सुपर ओव्हरचा थरार आणि शेवटच्या बॉलवर संपलेली रोमांचक मॅच. पण कित्येकवेळा आयपीएल काही वेगळ्या कारणांमुळेही चर्चेत येते. आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या एकूण 13 मोसमात चाहत्यांना कॅमेरावर अनेक मिस्ट्री गर्ल्स दिसल्या. या मुलींच्या सौंदर्यामुळे अनेक चाहते घायाळ झाले, तसंच या मुली एका दिवसात सोशल मीडियावर स्टार झाल्या.