

आयपीएलच्या या हंगामात देवदत्त पडीक्कलपासून कमलेश नागरकोटीपर्यंत अनेक युवा खेळाडूंनी पदार्पण केले. दिग्गज खेळाडूंपेक्षा सध्या सगळीकडे युवा खेळाडूंची चर्चा आहे. या लिस्टमध्ये आता आणखी एका गोलंदाजाचे नाव सामिल झाले आहे.


मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानकडून युवा गोलंदाज कार्तिक त्यागीनं पदार्पण केले. पदार्पणताच त्यानं केलेल्या गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


राजस्थानकडून पदार्पण करताना कार्तिकनं क्विंटन डी कॉकची विकेट घेतली. त्याचबरोबर चांगली गोलंदाजीही केली. त्यानं आपल्या 4 ओव्हरमध्ये 36 धावा देत एक विकेट घेतली.


कार्तिक त्यागीची गोलंदाजी पाहिल्यानंतर त्याचा सह खेळाडू आणि इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स त्याचा फॅव झाला आहे. बेननं ट्विट कर कार्तिकचे कौतुक केले आहे. बेन स्टोक्सनं कार्तिक हा ब्रेटली सारखा रनअप घेतो आणि गोलंदाजी इशांत शर्मासारखा करतो असे म्हटले.