

क्रिकेटपटू आणि अभिनेत्री, मॉडेल यांच्यातील प्रेम काही नवी नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डीकॉक (Quinton de Kock) चक्क चिअरलीडच्या प्रेमात पडला. एवढेच नाही तर त्यांनी लग्नही केलं. क्विंटन डीकॉकच्या पत्नीचे नाव साशा हर्ली आहे. साशा एक प्रोफेशनल चिअरलीडर आहे.


क्विंटन आणि साशा यांची लव्हस्टोरी अगदी एखाद्या सिनेमाप्रमाणे आहे. 2012मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चॅम्पियन्स लीग टी-20 सामना झाला होता, तेव्हा डीकॉक हायवेल्ड लायन्स संघाकडून खेळत होता.


या सामन्यात डीकॉकच्या संघानं विजय मिळवला. त्यावेळी साशानं फेसबुकवर डीकॉकचे अभिनंदन केले होते. येथून या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.


डीकॉक आणि साशा एकमेकांना तीन वर्ष डेट करत होते. त्यानंतर 2015मध्ये त्यांनी साखरपूडा केला. डीकॉकनं साशाला सरप्राइज गिफ्ट म्हणून मर्सिडीज गिफ्ट केली होती.