आयपीएल (IPL 2020) मधल्या सगळ्यात यशस्वी टीमपैकी एक असलेल्या चेन्नई (CSK)च्या पदरी यंदा निराशा पडली. चेन्नईला पहिल्यांदाच आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नई यंदा पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर राहिली. स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर एमएस धोनी युएईतून रांचीला परतला आहे.