राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. पण या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. धोनीची ही 200वी आयपीएल मॅच होती. हा विक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
2/ 5
धोनीने या मॅचमध्ये 28 बॉलमध्ये 28 रनची खेळी केली, यामध्ये 2 फोरचा समावेश होता. संजू सॅमसनने धोनीला रन आऊट केलं.
3/ 5
धोनीने त्याच्या 200व्या मॅचमध्ये चेन्नईसाठी 4 हजार रन पूर्ण केले.
4/ 5
या मॅचआधी धोनीच्या नावावर 4,568 रन होते, पण यापैकी 3,994 रन चेन्नईसाठी आणि 574 रन पुण्यासाठी करण्यात आल्या.
5/ 5
मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर चेन्नईच्या टीमवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी धोनी पुण्याच्या टीमकडून दोन मोसम खेळला होता. 2016 साली धोनीने पुण्याचं नेतृत्व केलं होतं, तर पुढच्या मोसमात स्टीव्ह स्मिथला पुण्याचं नेतृत्व देण्यात आलं होतं.