आयपीएल (IPL 2020) ची यावर्षीची अर्धी स्पर्धा संपली आहे. सगळ्या टीम एकमेकांविरुद्ध खेळल्या आहेत. प्रत्येक टीमच्या 7 मॅच झाल्यानंतर मुंबई आणि दिल्लीची टीम सगळ्यात पुढे आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये या दोन टीम पुढे असल्या तरी सर्वाधिक रन करणाऱ्या केएल राहुल याची टीम मात्र तळाला आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही युएईच्या मैदानांवर सिक्सचा पाऊस पडला. पण कायरन पोलार्ड आणि रोहित शर्मा यांच्यासारखे दिग्गज खेळाडू मात्र सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या रेसमध्ये नाहीत.