IPL 2020 : दिल्लीने फायनलसाठी घेतला सर्वाधिक वेळ, पाहा सगळ्या टीमचं रेकॉर्ड
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली (Delhi Capitals) पहिल्यांदाच आयपीएल (IPL 2020) फायनल खेळणार आहे. 10 नोव्हेंबरला दिल्लीचा मुकाबला मुंबई (Mumbai Indians) विरुद्ध होणार आहे.
|
1/ 8
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली (Delhi Capitals) पहिल्यांदाच आयपीएल (IPL 2020) फायनल खेळणार आहे. 10 नोव्हेंबरला दिल्लीचा मुकाबला मुंबई (Mumbai Indians) विरुद्ध होणार आहे. (फोटो सौजन्य दिल्ली कॅपिटल्स ट्विटर)
2/ 8
आयपीएल फायनल खेळण्यासाठी सर्वाधिक काळ दिल्लीला वाट पाहावी लागली. 13 व्या मोसमात ही टीम पहिल्यांदाच फायनल खेळणार आहे. (फोटो सौजन्य दिल्ली कॅपिटल्स ट्विटर)
3/ 8
आयपीएलच्या इतर टीमपैकी राजस्थान आणि चेन्नई यांनी 2008 सालची पहिली आयपीएल फायनल खेळली होती. या फायनलमध्ये राजस्थानचा विजय झाला होता.
4/ 8
डेक्कन चार्जर्स हैदराबाद आणि बँगलोर यांनी 2009 सालची आयपीएल फायनल गाठली होती. त्या मॅचमध्ये डेक्कन चार्जर्सने विजय मिळवला होता. (@RCBTweets)
5/ 8
आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम आणि 4 वेळा आयपीएल जिंकणारी मुंबई 2010 साली पहिल्यांदा आयपीएल फायनल खेळली होती. या मॅचमध्ये चेन्नईकडून त्यांचा पराभव झाला होता.
6/ 8
कोलकात्याने 2012 साली पहिली आयपीएल फायनल खेळली होती. आपल्या पहिल्याच फायनलमध्ये कोलकात्याने विजयाला गवसणी घातली होती. (@KKRiders Twitter)
7/ 8
पंजाबच्या टीमने 2014 सालची आयपीएल फायनल खेळली होती, पण या मॅचमध्ये कोलकात्याने त्यांचा पराभव केला होता.
8/ 8
आता दिल्लीच्या टीमला पहिल्यांदाच आयपीएल खेळण्याची संधी मिळाली आहे.