

आयपीएल(IPL 2020) च्या या मोसमात कोलकाता (KKR)ची कामगिरी निराशाजनक झाली. ग्रुप स्टेजमध्येच आव्हान संपल्यानंतर कोलकात्याचे खेळाडू बायो बबलमधून बाहेर येऊन दुबईमध्ये फिरताना दिसत आहेत. कोलकात्याचा खेळाडू नितीश राणा आणि आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लोरा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


आयपीएलच्या या मोसमात कोलकात्याला प्ले-ऑफ गाठता आलं नाही. कोलकात्याने 14 पैकी 7 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर तेवढ्याच मॅच त्यांना गमवाव्या लागल्या. खराब नेट रनरेटमुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नाही.


कोलकात्याचा ऑलराऊंडर आंद्रे रसेल याची पत्नी जेसिमही सध्या दुबईमध्येच आहे. जेसिमने दुबईतला पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नाईट क्लबमध्ये हुक्का पिताना दिसत आहे.


या व्हिडिओमध्ये कोलकात्याच्या टीमचे इतर खेळाडूही जेसिमसोबत दिसत आहेत. कोलकात्याचा बॅट्समन नितीश राणाही जेसिमसोबत आहे.