आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी आयपीएलचा हंगाम 29 मार्च ते 24 मे पर्यंत खेळला जाणार आहे. यावेळी एकूण 56 सामने होणार आहेत. गेल्या 12 वर्षांप्रमाणेच यावेळी चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळेल.
2/ 12
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. आयपीएलच्य इतिहासात आजही असे 5 फलंदाज आहेत, ज्यांनी सर्वात जास्त धावा केल्या आहेत.
3/ 12
हिटमॅन या नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा आयपीएलमधला सर्वात यशस्वी फलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. 188 सामन्यात त्यानं 4898 धावा केल्या आहेत.
4/ 12
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 2013, 2015, 2017, 2019मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवले. मुंबई इंडियन्सकडून रोहित सलामीला फलंदाजीसाठी उतरतो.
5/ 12
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज म्हणजे सुरेश रैना. सुरेश रैनानं आतापर्यंत एकही सामना मिस केलेला नाही. त्यानं आयपीएलमध्ये तब्बल 193 सामने खेळले आहेत. यात 38 अर्धशतकासह 5368 धावा केल्या आहेत.
6/ 12
रैनाच्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नई संघाने 2009, 2010, 2018मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आयपीएलच्य इतिहासतला रैना सर्वोत्तम फलंदाज आहे.
7/ 12
ऑस्ट्रेलियाचा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चेत असतो. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या वॉर्नरनं आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
8/ 12
वॉर्नरनं आयपीएलमध्ये 126 सामने खेळले आहेत. यात 44 अर्धशतक आणि 4 शतकांसह 4706 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम खेळी 126 आहे.
9/ 12
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं नाही तर आयपीएलही गाजवत आला आहे. विराटनं 177 सामन्यात 37.84च्या सरासरीनं 5412 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे.
10/ 12
विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही. मात्र आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
11/ 12
ख्रिस गेल, या नावानेच आयपीएलमधल्या जवळ जवळ सर्व गोलंदाजांना धडकी भरते. गेलनं 125 सामन्यात आयपीएलमध्ये 4484 धावा केल्या आहेत. यात 6 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे.
12/ 12
आयपीएलमधला सर्वात खतरनाक फलंदाज म्हणून युनिवर्सल बॉस गेलला ओळखले जाते. गेलनं अनेकवेळा आपल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत.