होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
IPL 2020 : पती खेळाडू आणि पत्नी शिक्षिका! दिल्ली कॅपिटल्सच्या या गोलंदाजाची भन्नाट Love Story
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किया सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघासाठी खेळत आहे. त्याच्या पत्नीचे नाव मिकायला असून दोघे शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात.
1/ 5


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारी दिल्ली कॅपिटल्स या आयपीएलमध्ये विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. या कामगिरीमध्ये त्यांचा वेगवान गोलंदाज नॉर्किया याचा मोठा हात असून त्याने आतापर्यंत 12 मॅचमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत.
2/ 5


दिल्ली कॅपिटल्सने त्याला ख्रिस वोक्स याचा बदली खेळाडू म्हणून घेतले होतं. नॉर्किया याचा आयपीएलचा हा पहिलाच सिझन असून त्याने सर्वांना प्रभावित केलं आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याची पत्नी शिक्षिका आहे.
3/ 5


नॉर्कियाची पत्नी मिकायला शिक्षिका असून दोघेही शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखत आहेत. मागील वर्षी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
4/ 5


आयपीएलमध्ये नॉर्किया मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होता. पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता.