आयपीएल (IPL 2020)च्या पंजाब (KXIP)विरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबाद (SRH)च्या बॅट्समननी धमाकेदार बॅटिंग केली. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 201 रन केले. हैदराबादसाठी ओपनर जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक 97 रनची खेळी केली, तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही शानदार अर्धशतक केलं. वॉर्नरने 40 बॉलमध्ये 52 रन केले. या अर्धशतकासोबतच डेव्हिड वॉर्नरने इतिहास घडवला. वॉर्नरने असं रेकॉर्ड केलं जिथपर्यंत अजून कोणीही पोहोचलेलं नाही.