विमानतळावर कृणाल पांड्याकडे सापडल्या या वस्तू, DRI ने घेतलं होतं ताब्यात
मुंबई (Mumbai Indians)ने रेकॉर्ड पाचव्यांदा आयपीएल (IPL 2020) स्पर्धा जिंकली. मुंबईला विजयी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कृणाल पांड्या (Krunal Pandya) ला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं.


मुंबई (Mumbai Indians)ने रेकॉर्ड पाचव्यांदा आयपीएल (IPL 2020) स्पर्धा जिंकली. मुंबईला विजयी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कृणाल पांड्या (Krunal Pandya) ला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. कृणाल पांड्याकडे महागडी घड्याळं सापडली होती. आयपीएल संपल्यानंतर युएईवरुन परतल्यावर मुंबई विमानतळावर DRI ने कृणाल पांड्याला रोखून धरलं होतं. (Photo- Krunal Pandya Instagram)


DRI ने शुक्रवारी पांड्याला महागडी घड्याळं आणल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. DRI ने हे प्रकरण आता कस्टम विभागाकडे सपूर्द केलं आहे.


कृणाल पांड्याकडे एकूण 4 घड्याळं मिळाली, या घड्याळांची किंमत जवळपास 75 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृणालकडून दोन रोलेक्स आणि दोन Audemar Piguet जप्त करण्यात आली आहेत. (Instagram)


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातली दोन घड्याळं कृणालची तर दोन घड्याळं त्याचा भाऊ हार्दिक पांड्याची आहेत. याबाबत कृणालला कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल आणि त्याच्याकडून दंडाची रक्कम स्वीकारली जाईल.