

आयपीएल 2020साठी (Indian Premier League 2020) कोलकातामध्ये 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. यासाठी आठही संघ सध्या जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएल लिलावात युवा खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागण्याची शक्यता आहे.


आयपीएल ही जगातली सर्वात मोठी लीग असून यात दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल केली जाते. मात्र यंदा रेकॉर्ड ब्रेक खेळाडूंच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावासाठी 971 खेळाडूंनी निलामीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.


बेन स्टॉक्स (राजस्थान रॉयल्स): आयपीएलच्या इतिहासातील काही मोजक्या खेळाडूंपैकी बेन स्टॉक्स एक आहे ज्यांनी लिलावात दोनदा दहा कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लावली आहे. त्याला आयपीएल 2017 पूर्वी रायझिंग पुणे सुपरगिजंटने 14.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. यानंतर, राजस्थान आयपीएल 2018 पूर्वी, 12.5 कोटी खर्च करून रिटेन केले होते. दोन्ही हंगामात बेन स्टोक्सला विशेष कामगिरी करता आली नाही.


राजस्थान रॉयल्सकडून त्याने 22 सामने खेळले आहेत आणि 319 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटदेखील 125 पेक्षा कमी झाला असून त्याने केवळ 14 विकेट घेतल्या आहेत. गेल्या 2 हंगामात ते अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले.


दिनेश कार्तिक (कोलकाता नाइट रायडर्स): दिनेश कार्तिकने भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान निश्चित केले नसले तरी आयपीएलमध्ये त्याला मोठी मागणी आहे. 2014 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने या फलंदाजाला 12.5 कोटींना विकत घेतले होते. दिल्लीने पुढच्या सत्रात त्याला सोडले.


2015मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कार्तिकसाठी सर्वात जास्त म्हणजे 10.5 कोटींची बोली लावली. परंतु या संघासाठी तो अत्यंत अपयशी ठरला आणि 14 सामन्यात त्याला केवळ 111 धावा करता आल्या. त्यानंतर त्याला बंगळुरू संघानं काढल्यानंतर आता कार्तिक कोलकाता संघाचा कर्णधार आहे.


टेमल मिल्स: इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज भारतातील फारच कमी लोकांना माहित आहे. आयपीएल 2017 च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टेमल मिल्सला खरेदी केले. पण हा गोलंदाज भारतीय खेळपट्ट्यांवर काहीही करू शकला नाही. त्याला खेळायला फक्त 5 सामने मिळाले. आरसीबी गुणांच्या तक्त्याच्या खाली राहिला.


युवराज सिंग: युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली डेअरडेविल्स यांनीही दहा कोटींपेक्षा अधिक किंमतीला विकत घेतले. 2014मध्ये, आरसीबीसाठी युवीची कामगिरी चांगली होती पण कदाचित मोठ्या रकमेमुळे आरसीबीने त्याला सोडले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्याने 14 सामन्यांत 376 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीने त्याला 16 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. दिल्लीकडून मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.


जयदेव उनाडकट (राजस्थान रॉयल्स): राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या 10 हंगामात कोणत्याही खेळाडूसाठी 10 कोटी किंवा जास्त खर्च केलेला नाही. परंतु 2018 मध्ये त्याने बेन स्टॉक्स आणि जयदेव उनाडकट यांना अनुक्रमे 12.5 कोटी आणि 11.5 कोटीमध्ये खरेदी केले. पण बेन स्टॉक्समध्ये उनादकटच्या बाबतीतही तेच घडले. 2018 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी तो 15 सामन्यांत 11 गडी बाद करण्यास सक्षम झाला. यानंतर त्याला रॉयल्सने सोडले. मात्र आयपीएल 2019 पूर्वी, ते राजस्थान रॉयल्सने पुन्हा खरेदी केले परंतु तो पुन्हा अपयशी ठरला.