होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


आयपीएल (IPL 2020)च्या प्रत्येक सामन्यात फोर आणि सिक्सचा पाऊस पडत आहे. पण युएईमधलं शारजाहचं मैदान बॅट्समनसाठी दिवाळी तर बॉलरचं दिवाळं काढत आहे. शारजाहच्या या मैदानात बॉलरची धुलाई सुरू आहे.
2/ 4


सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)यांच्यातल्या सामन्यात विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. मुंबईने पहिले बॅटिंग करत 200 रनचा टप्पा ओलांडताच हा विक्रम झाला. शारजाह जगातलं पहिलं मैदान ठरलं जिकडे लागोपाठ 7 वेळा टी-20 क्रिकेटमध्ये 200 रनचा आकडा ओलांडला गेला.
3/ 4


शारजाहच्या मैदानात खेळल्या गेल्या 7 इनिंगमध्ये दिल्ली 228, राजस्थान 226, पंजाब 223, कोलकाता 210, मुंबई 208 आणि चेन्नईने 200 रनचा स्कोअर केला.