

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात नेहमीप्रमाणे सिक्सचा पाऊस पडत आहे. संजू सॅमसन, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनीस यांच्यासारख्या खेळाडूंनी यावेळी उत्तुंग सिक्स लगावले आहेत. पण असेही काही बॅट्समन आहेत, ज्यांनी 50 पेक्षा जास्त बॉल खेळल्यानंतरही एकही सिक्स मारलेला नाही. या खेळाडूंवर लिलावात मात्र कोट्यवधी रुपयांची बोली लागली होती.


आयपीएलमध्ये यावर्षी सगळ्यात जास्त 59 बॉल खेळूनही केदार जाधवला एकही सिक्स मारता आलेला नाही. चेन्नईकडून खेळणाऱ्या केदार जाधवचा फॉर्म यावर्षी अत्यंत खराब आहे. जाधवने 4 इनिंगमध्ये 19.33च्या सरासरीने 58 रन केले आहेत.


जाधवनंतर ग्लेन मॅक्सवेल याने 56 बॉल खेळून एकही सिक्स मारलेला नाही. पंजाबकडून खेळणारा मॅक्सवेल यंदाच्या वर्षी पुरता फ्लॉप ठरला आहे. 6 मॅचमध्ये त्याने 12 च्या सरासरीने फक्त 48 रन केले आहेत. मॅक्सवेलचा स्ट्राईक रेटही 100 पेक्षा कमी आहे.


तिसऱ्या क्रमांकावर कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिक आहे. 48 बॉल खेळल्यानंतरही कार्तिकला एकही सिक्स लगावता आलेला नाही. कार्तिकने 5 मॅचमध्ये फक्त 49 रन केले आहेत.