

महिलांच्या आयपीएल स्पर्धेत मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेलोसिटीने ट्रेलब्लेजर्सला 3 विकेटने पराभूत केलं. स्मृती मानधना कर्णधार असलेल्या ट्रेलब्लेजर्सने प्रथम फलंदाजी करताना 113 धावा केल्या.


प्रत्युत्तरादाखल खेळताना वेसोसिटीने 7 विकेटच्या बदल्यात 18 षटकांत हे आव्हान पूर्ण केले. डॅनियल वॅटच्या खेळीच्या जोरावर हा सामना एकहाती जिंकण्याची शक्यता होती. 17 व्या षटकात वॅटला बाद करून राजेश्वरी गायकवाडने सामन्यात रंगत आणली. वॅटने 46 धावा केल्या.


त्यानंतर पुढच्या सहा चेंडूत बाद वेलोसिटीचे चार फलंदाज झाले. डॅनियल वॅट बाद झाली त्यावेळी 16.5 षटकात 4 बाद 111 धावसंख्या होती. त्यानंतर 17.5 षटकांत संघाची अवस्था 7 बाद 111 झाली. शेवटी सुश्री प्रधानने दोन धावा घेत संघाला त्याच षटकात विजय मिळवून दिला.


17 व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट घेतल्या. त्यानंतर दिप्ती शर्माने 18 व्या षटकातील पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर तीन फलंदाज बाद केले. शेवटी वेलोसिटीच्या सुश्री प्रधानने दोन धावा घेत संघाला विजय मिळवून दिला.