

आयपीएलच्या 12 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघावर चाहत्यांची नजर असेल. आजपर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद या संघाला पटकावता आलेले नाही.


आरसीबीमध्ये विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स सारखे दिग्गज खेळाडू आहेत. यांच्यात संघाला विजेतेपद मिळवून देण्याची ताकद आहे. या संघाच्या नावावर असे विक्रम आहेत ज्याच्या आसपास दुसऱे कोणतेच संघ नाहीत.


आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा काढण्याचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. पुणे वॉरिअर्स विरुद्ध खेळताना त्यांनी 5 बाद 263 धावा केल्या होत्या.


कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी आरसीबीचे खेळाडू विराट आणि डीव्हिलियर्स यांच्या नावावर आहे. त्यांनी गुजरात लायन्स विरुद्ध खेळताना 229 धावा केल्या होत्या.


आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम याच संघातील खेळाडूच्या नावावर आहेत. विराट कोहलीने एका हंगामात 973 धावा केल्या आहेत.


आयपीएलच्या रणसंग्रामाला 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या 12 व्या हंगामापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला(आरसीबी) एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही.


आरसीबी एकदाही विजेतेपद का मिळवू शकली नाही याचे कारण कर्णधार विराट कोहलीने सांगितले. आरसीबीचे अॅप लॉन्च करण्यात आले त्यावेळी तो बोलत होता.


शनिवारी आरसीबीचे अॅप लॉन्च केले त्यावेळी कर्णधार विराट कोहली, आशिष नेहरा आणि संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टनदेखील उपस्थित होते.


यावेळी कोहली म्हणाला की, चुकीच्या निर्णयामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागतो. मोठ्या सामन्यात आमची निर्णय क्षमता चांगली नव्हती. त्याचा फटका संघाला बसला.


ज्या संघांमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतले त्यांनी आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावले असल्याचे कोहली म्हणाला.


आतापर्यंत आरसीबी तीनवेळा अंतिम सामन्यात पोहचला. तर तीन वेळा उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. विजेतेपदाच्या जवळ जाऊन अपयश आल्यानंतर पुढच्या हंगामात खेळताना आमचा उत्साह कमी झाला नाही ही बाब आमच्यासाठी महत्त्वाची आहे असं कोहलीने सांगितले.