गेल्या आयपीएल हंगामाचा विजेता असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने यंदा पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पराभूत करून विजयी सुरुवात केली आहे.
2/ 7
महेंद्रसिंग धोनीच्या सीएसकेने विजयाने या हंगामाची सुरुवात केली आहे. या सामन्याला धोनीची पत्नी साक्षीही उपस्थित होती.
3/ 7
अवघ्या 70 धावांचे आव्हान पार करताना सीएसकेची दमछाक झाली. त्यांना हे आव्हान पार करण्यासाठी 17.4 षटके लागली.
4/ 7
आरसीबीने दिलेले 70 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरल्यानंतर खराब सुरुवात झाली. संघाच्या आठ धावा झाल्या असतानाच शेन वॉटसन बाद झाला.
5/ 7
त्यानंतर मात्र सीएसकेने सामन्यावर पकड मिळवली. रैना आणि रायडु यांनी 32 धावांची भागिदारी केली. शिवम दुबेने या दोघांची जोडी फोडली.
6/ 7
7/ 7
आयपीएलच्या 12 व्या हंगामाची सुरुवात सीएसके आणि आरसीबी यांच्या लढतीने झाली. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करत सीएसकेने आरसीबीला 17.1 षटकांत 70 धावांत गुंडाळले. त्यानंतर सीएसकेने फलंदाजी करताना तीन विकेटच्या बदल्यात 17.4 षटकांत विजय मिळवला.