दिल्लीला 6 विकेटने नमवून चेन्नईने आयपीएलच्या फायनलला आठव्यांदा धडक मारली आहे. दिल्लीने दिलेलं 148 धावांचं आव्हान चेन्नईने 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामना पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीसुद्धा उपस्थित होती. सामन्यात सुरुवातीला साक्षीच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. चेन्नईच्या फलंदाजीवेळी साक्षीने सेलिब्रेशन केलं. यावेळी सोबत सुरेश रैनाची पत्नी प्रियांकासुद्धा उपस्थित होती. सामन्यानंतर धोनीची मुलगी झिवा आणि रैनाची मुलगी ग्रेसिया मैदानावर खेळल्या. या फोटोची चर्चाही सोशल मीडियावर होत आहे.