Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पहिल्याच वनडे सामन्यात स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ड यांच्या खेळाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 9 गडी आणि 102 चेंडू राखून विजय मिळवला.
2/ 5


न्यूझीलंडने दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने शतक साजरे केले. तिचे हे चौथे आंतरराष्ट्रीय शतक आहे. या शतकाबरोबरच आतापर्यंत एकाही भारतीय महिला खेळाडूला जमली नाही अशी कामगिरी तिने केली.
3/ 5


स्मृती मानधनाने 104 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार खेचत 105 धावा केल्या. तीने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया म्हणजेच 'SENA' देशांमध्ये वनडेत शतक करण्याची कामगिरी केली आहे.