Asia Cup 2022: बीसीसीआयने शेअर केले 11 खेळाडूंचे फोटो, हीच आहे पाकविरुद्धची प्लेईंग XI?
Asia Cup 2022: आशिया चषकाचं बिगुल आजपासून वाजणार आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघात आज सलामीचा सामना खेळवण्यात येईल. पण याच स्पर्धेतला सर्वात लक्षवेधी सामना होणार आहे तो रविवारी. याच सामन्यात भारताची प्लेईंग इलेव्हन काय असेल याबाबत बीसीसीआयनं एक हिंट दिली आहे.
दुसरा फोटो आहे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा. एका मोठ्या ब्रेकनंतर विराट मैदानात उतरणार आहे.
3/ 10
बीसीसीआयनं ट्विट केलेल्या तिसऱ्या फोटोमध्ये दिसतोय सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार चौथ्या नंबरवर फलंदाजीला उतरेल असा अंदाज आहे. सूर्यकुमार सध्या टी20त जगातला दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे
4/ 10
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमधला एकमेव ऑल राऊंडर असेल हार्दिक पंड्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्यापासून हार्दिक जबरदस्त फॉर्मात आहे.
5/ 10
रिषभ पंत भारताच्या प्लेईंग इलेव्हनमधला महत्वाचा शिलेदार आहे. तो नंबर 5 वर उतरण्याची शक्यता आहे.
6/ 10
अनुभवी दिनेश कार्तिकचा सराव करतानाचा फोटोही बीसीसीआयनं शेअर केला आहे. कार्तिकनं आयपीएल 2022 मध्ये काही शानदार खेळी केल्या होत्या. त्यानंतर त्याचं भारतीय संघात पुनरागमन झालं होतं.
7/ 10
आशिया चषकात जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारकडे गोलंदाजीच्या आघाडीवर मोठी जबाबदारी असेल. दुखापतीमुळे यंदा आशिया चषकात बुमरा खेळताना दिसणार नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमारकडे असेल.
8/ 10
युजवेंद्र चहल भारतीय लाईन अपमधला प्रमुख फिरकी गोलंदाज असेल.
9/ 10
आशिया चषकात टीम इंडियातला नवा चेहरा असेल तो आवेश खान. अंतिम अकरात वेगवान गोलंदाज म्हणून आवेशचा समावेश होण्याची शक्यता आहे. आवेशनं आतापर्यंत 13 टी20 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत
10/ 10
डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्शदीप सिंग रोहित शर्मासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो मालिकावीराचा मानकरी ठरला होता.