

भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी गेल्या काही वर्षांत उंचावली आहे. यामुळे भारतात महिलांच्या क्रिकेटच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. नुकतंच भारताच्या स्मृती मानधनाने आयसीसी रँकिंगमध्ये बॅटसवूमनचा पुरस्कार पटकावत जगात एक नंबरवर पोहचली आहे.


भारताची कर्णधार मिताली राजने एकदिवसीय क्रिकेटचे 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.


आता भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या व्हीआर वनिताने तुफान फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. तिची ही तुफान फटकेबाजी चर्चेचा विषय बनली आहे.


वनिथाने कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशिएशन क्लब लिगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. तिने केवळ 93 चेंडूत 206 धावा काढल्या.


या द्विशतकी खेळीत तिने 12 उत्तुंग षटकारासह 19 चौकार वनिताने मारले. चेन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिने ही कामगिरी केली.


व्हीआर वनितानं भारताचं 22 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. त्यात 6 वन डे आणि 16 टी20 सामने खेळली आहे. कर्नाटकातील 16 क्लब लीगच्या टी20 सामन्यात तिने केलेल्या चौफेर फटकेबाजीचे कौतुक सोशल डियावरुन होत आहे.