

एजबेस्टनमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या रंजक वळणावर आहे.


पहिल्या डावात इंग्लंडने २८७ धावा केल्या होत्या. दरम्यान भारतीय संघाच्या ढिल्ल्या क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडला २८७ पर्यंत मजल मारता आली.


अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिक यांनी दोन स्लिपचे झेल सोडले. सामन्या दरम्यान इंग्लंडच्या कीटन जेनिंग्स आणि सॅम करण या दोन खेळाडूंना जिवनदान मिळालं.


जेनिंग्सच्या नऊ धावांवर असताना अजिंक्य रहाणेकडून त्याचा झेल चुकला. त्यानंतर सॅमच्या २४ धावा झाल्यावर भारताचा क्षेत्ररक्षक दिनेश कार्तिककडून परत झेल सुटला.


भारताला हे दोन झेल चुकल्याचे महागात पडणार आहे असे दिसून येत आहे. भारतीय संघ हा स्लिपमध्ये झेल घेण्यात सर्वांत कमकुवत आहे.


१ जानेवारी २०१५ ते आत्तापर्यंत कसोटी सामन्यात, स्लिपमध्ये चेंडू झेलण्यात न्युझीलँडचा संघ सर्वांत पुढे आहे आणि भारत यामध्ये शेवटच्या स्थानी आहे.


स्लिपमध्ये न्युझीलँडने ९१ टक्के चेंडू झेलले आहेत. त्यानंतर साऊथ आफ्रीकेने ८५, श्रीलंकाने ८४, वेस्टइंडीजने ८१ त्यामागोमाग ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी ७९ आणि इंग्लंडने ७३ टक्के चेंडू झेलले आहेत. भारताने ६७ टक्के तर बांग्लादेशने ४२ टक्के चेंडू स्लिपमध्ये झेलले आहे.