

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाला. वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर 3 ऑगस्टपासून भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे.


या दौऱ्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीनं प्रो कबड्डी लीग 2019मध्ये मुंबईकरांना चीअर करण्यासाठी पोहचला. यू-मुंम्बा आणि पुणेरी पलटन यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहली उपस्थित होता.


प्रो कबड्डी लीगच्या मुंबई मधील झालेल्या सामन्यांमध्ये रविवारी विराट कोहली उपस्थित होता. यावेळी कोहलीला भारतीय संघातील कोणते खेळाडू कबड्डी खेळू शकतात असे विचारले असता त्यानं महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले.


पुणेरी पलटन आणि यु-मुंम्बा यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीनं, "मी लहानपणापासून हा खेळ खेळत होते. पण आज या खेळ थोडा वेगळा वाटतो. केवळ भारतीयच नाही तर जगभर या खेळाची किर्ती पसरली आहे",असे मत व्यक्त केले.


विराटने राहुल चौधरी आणि अजय ठाकूर हे आपले आवडते खेळाडू असल्याचे यावेळी सांगितले. तसेच, हे दोन्ही खेळाडू धोनीची कॉपी असल्याचे सांगितले.