India vs South Africa : टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल; कडक नियम आणि सुरक्षेत दिसले खेळाडू
India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ दाखल झाला आहे. त्यावेळी ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता सर्व खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांना मोठी सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे. पाहा PHOTOS
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला पोहचली आहे. या दोऱ्यात भारतीय टीम 3 टेस्ट आणि 3 वन-डे खेळणार आहे. त्यातला संघाचा पहिला सामना हा 26 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.
2/ 6
भारताचे खेळाडू हे विशेष विमानाने आफ्रिकेला रवाना झाले. तिथे पोहचल्यानंतर काही खेळाडूंचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.
3/ 6
आता या सामन्यांसाठी टीम इंडियाचा कर्णधार हा विराट कोहली असून पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला सुरू होणार आहे.
4/ 6
बीसीसीआयने ट्विटरवर शेयर केलेल्या या फोटोमध्ये फलंदाज चेतेश्वर पुजारा दिसत आहे.
5/ 6
टीम इंडियाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी सीरिज जिंकलेली नाही. त्यामुळे आता त्यांना इतिहास रचण्याची ही चांगली संधी असणार आहे.
6/ 6
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता केएल राहुल हा आफ्रिकेत टेस्ट सीरिजमध्ये आपली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.