वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया (Team India) 3 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. या टीममध्ये फास्ट बॉलर नवदीप सैनीची (Navdeep Saini) निवड करण्यात आलेली नाही, त्यामुळे घरीच असलेल्या नवदीप सैनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैनीनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये सैनी हार्ले डेविडसन बाईक चालवताना दिसत आहे. ही बाईक चालवताना आजूबाजूची रेती आणि धूळ उडताना दिसत आहे. बाईक सुरू केल्यानंतर सैनीने एकाच जागेवर उभं राहून एक्सलरेटर चालवल्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.