

भारताने विंडीजविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात विंडीजने दिलेले 146 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयात ऋषभ पंतचा वाटा मोलाचा होता.


वेस्ट इंडिज दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीनं विश्रांती घेतल्यामुळं ऋषभ पंतला संघात स्थान मिळाले. पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावाच काढता आल्या होत्या.


तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं. भारताच्या यष्टीरक्षकानं एका टी20 सामन्यात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. त्यामुळं पंतनं धोनीचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे.


पंतच्या आधी धोनीच्या नावावर 2017मध्ये इंग्लंड विरोधात 56 धावा करण्याचा विक्रम होता. मात्र धोनीचा हा सर्वात मोठा विक्रम पंतनं तिसऱ्या टी-20 सामन्यात तोडला