

भारताने विंडीजविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात विंडीजने दिलेले 146 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.


ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली. भारताचा गोलंदाजी दीपक चाहरनं तीन षटकांत फक्त 4 धावा देत विंडीजचे तीन गडी बाद केले. त्यानं केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे विंडीजला 146 धावांत रोखता आलं. चाहरनं सामनावीर पुरस्कार पटकावला.


दरम्यान या सामन्यात विराटनं युवा खेळाडूंना संधी दिली. एकाच दिवशी 20 वर्षीय राहुल चहर यानं आपला चुलत भाऊ राहुल चहर यासोबत पदार्पण केले. भारतासाठी खेळणारी ही चौथी भावांची जोडी आहे.


भारतासाठी सर्वात आधी कोणच्या भावांची जोडी एकत्र खेळली असेल तर ती आहे, सुरिंदर अमरनाथ आणि मोहिंदर अमरनाथ. हे दिग्गज खेळाडू लाला अमरनाथ यांचे सुपुत्र. सुरिंदर यांनी घरेलु क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली मात्र त्यांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष चांगली कामगिरी करता आली नाही.


तर, मोहिंदर अमरनाथ यांनी आपल्या फलंदाजीनं इमरान खान ते माल्कम मार्शल यांच्यासारख्या खेळाडूंना आकर्षित केले. मोहिंदर अमरनाथ यांचा 1983च्या वर्ल्ड कप विजयात मोलाचा वाटा होता.


यानंतर क्रमांक येतो तो, पठाण बंधूंचा. युसुफ आणि इरफान पठान दोघांनी घरेलु क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांची भारतीय संघात निवड झाली. 2003मध्ये मोठया भावाआधी इरफाननं पदार्पण केलं, तर 2007मध्ये युसुफ भारतासाठी खेळला.


पांड्या बंधू सध्या सर्वात जास्त यशस्वी भावांची जोडीत पहिल्या क्रमांकावर आहेत. दोघंही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. हार्दिक पांड्या भारताचा एक महत्त्वाचा हुकुमी एक्का आहे. 2016मध्ये त्यानं भारतीय संघात पदार्पण केले.