होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 7


भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीमध्ये हनुमा विहारीनं तर, गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहनं कमाल केली. त्यामुळं या सामन्यात भारताचे पारडे जड आहे.
2/ 7


मात्र, या सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती इशांत शर्माची. आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इशांतनं या सामन्यात फलंदाजी करत कमाल केली.
4/ 7


शतकी भागिदारीसोबत इशांत शर्मानं आपले अर्धशतक पूर्ण केले. हे इशांत शर्माचे पहिले अर्धशतक होते. इशांतनं 80 चेंडूत 57 धावा केल्या, यात सात चौकारांचा समावेश होता.
5/ 7


2007मध्ये बांगलादेश विरोधात पदार्पण करणाऱ्या इशांतनं तब्बल 91 सामने आणि 125 डावांनंतर अर्धशतकी खेळी केली.
6/ 7


याचबरोबर इशांतनं एका खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सगळ्यात जास्त कसोटी डावांत अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इशांत दुसऱ्या स्थानावर आहे.