वनडे सीरिजआधी श्रीलंका टीमला मोठा धक्का लागला आहे. टीमचा माजी कर्णधार एन्जलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने सीरिज खेळायला नकार दिला आहे, तसंच तो निवृत्त होणार असल्याचंही वृत्त आहे. मॅथ्यूजने बोर्डासोबत सुरू असलेल्या कराराच्या वादामुळे माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. श्रीलंकेच्या 30 पैकी 29 खेळाडूंनी नव्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भारतीय टीम : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया नेट बॉलर : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग