शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) दुसऱ्या मॅचमध्ये 3 विकेटने विजय मिळवला, याचसोबत भारताने सीरिजही जिंकली. दुसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 276 रनची गरज होती. हे आव्हान टीमने 5 बॉल शिल्लक असतानाच पूर्ण केलं. एकवेळ भारताचा स्कोअर 160 रनवर 6 विकेट होता, तेव्हा विजय अशक्य वाटत होता.