टी-20 सीरिजमध्ये न्यूझीलंडला 3-0 ने व्हाईट वॉश केल्यानंतर आता टीम इंडिया (India vs New Zealand) टेस्ट सीरिजमध्येही किवींना क्लीन स्वीप करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही देशांमध्ये 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये पहिली टेस्ट होणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे टीमचा कॅप्टन असेल. भारताचा हेड कोच म्हणून राहुल द्रविडची ही पहिलीच सीरिज आहे, त्यामुळे तो तयारीमध्ये कोणतीही कमी सोडत नाहीये. कानपूरमध्ये सराव सत्रामध्येही द्रविड टीमच्या प्रत्येक खेळाडूशी बोलताना दिसला. (Photo- BCCI Twitter)
अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) कानपूर टेस्टआधी सराव सत्रात घाम गाळताना दिसला. पहिल्या टेस्टमध्ये रहाणेच टीमचा कर्णधार असेल. विराट कोहली मुंबईमध्ये 3 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपासून विराटचं टीममध्ये पुनरागमन होईल. कोहलीनेही मुंबईमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. रहाणेने 2019 पासून 40 टेस्ट खेळल्या, यात त्याने 7 अर्धशतकं आणि 3 शतकं केली. (Photo- BCCI Twitter)
केन विलियमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात न्यूझीलंडने जून महिन्यात भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता, पण किवींना भारताला भारतात हरवणं सोपं जाणार नाही. न्यूझीलंडला आतापर्यंत कधीच भारतात टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवता आला नाही. याआधी 2016-17 साली न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती, तेव्हा भारताने त्यांना 3-0 ने धूळ चारली.