टीम साऊदीने कुंबळेला टाकलं मागे, आता अश्विनचा रेकॉर्ड निशाण्यावर!
India vs New Zealand 2021: भारताविरुद्ध कानपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम साऊदीने (Tim Southee) दुसरी विकेट घेताच अनिल कुंबळेचं (Anil Kumble) रेकॉर्ड मोडलं. साऊदी भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा न्यूझीलंडचा दुसरा बॉलर बनला आहे.
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदी (Tim Southee) याने कानपूरमध्ये भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या (India vs New Zealand 1st Test) चौथ्या दिवशी भारताचा दिग्गज खेळाडू अनिल कुंबळेला (Anil Kumble) मागे टाकलं आहे. साऊदीचं लक्ष आता अश्विनच्या रेकॉर्डवर आहे.
2/ 6
भारताच्या बॅटिंगच्या दुसऱ्या इनिंगमध्ये साऊदीने आपली दुसरी विकेट घेतली, तेव्हा त्याने भारत-न्यूझीलंड यांच्यात टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडला.
3/ 6
साऊदीने भारताविरुद्ध 10 मॅचमध्ये 51 विकेट घेतल्या आहेत. तर अनिल कुंबळेच्या नावावर न्यूझीलंडविरुद्ध 11 मॅचमध्ये 50 विकेट होत्या.
4/ 6
साऊदीच्या वर या यादीमध्ये रिचर्ड हॅडली (65 विकेट), बिशन बेदी (57 विकेट), प्रसन्ना (55 विकेट) आणि अश्विन (55 विकेट) आहेत.
5/ 6
साऊदीचं लक्ष आता अश्विनच्या रेकॉर्डवर आहे, पण त्याला अश्विनच्या पुढे जाणं सोपं राहणार नाही, कारण या सीरिजमध्ये अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट घेतल्या, तसंच तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
6/ 6
टीम साऊदी भारताविरुद्ध सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारा न्यूझीलंडचा दुसरा बॉलरही बनला आहे.