इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजआधी (India vs England) भारतीय क्रिकेट टीम अडचणीत सापडली आहे. टीम इंडियाचे 3 खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. सराव सामन्यामध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) अंगठ्याला दुखापत झाली, त्यामुळे तो टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे, तसंच फास्ट बॉलर आवेश खानही (Avesh Khan) दुखापतीमुळे सीरिजला मुकणार आहे. दोन आठवड्यांआधीच शुभमन गिलही (Shubhaman Gill) दुखापतीमुळे भारतात परतला आहे. त्यामुळे आता निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी नव्या खेळाडूंना पाठवू शकते.