इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Lords Test) 151 रनने ऐतिहासिक विजय झाला. पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशीही पावसाने खेळ रद्द झाला नसता तर भारताला विजय मिळवण्याची संधी होती. टीम इंडियाचा हा फॉर्म आणि इंग्लंडच्या खेळाडूंना झालेल्या दुखापती, यामुळे उरलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे. या सीरिजमध्ये इंग्लंडचा एक नाही तर तब्बल 6 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. याचा फटका इंग्लंडला बसला आहे.