इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमधून (India vs England) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इशान किशनने (Ishan Kishan) आपल्या पहिल्याच मॅचमध्ये धमाका केला आहे. ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या इशान किशनने 32 बॉलमध्ये 56 रन केले. 175 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत इशानने 5 फोर आणि 4 सिक्स मारले.