होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समन अपयशी ठरले. पण रोहित शर्माने मात्र या टेस्टमध्ये खास विक्रम केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये रोहित शर्माच्या एक हजार रन पूर्ण झाल्या आहेत. याचसोबत त्याने स्वत:च्या नावावर खास विक्रम केला आहे.
2/ 5


चौथ्या टेस्टमध्ये पहिले बॅटिंग करत इंग्लंडचा 205 रनवर ऑल आऊट झाला. यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताची सुरूवात खराब झाली. शुभमन गिलच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली.
3/ 5


यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये गेले. विराट कोहलीला तर त्याचं खातंही उघडता आलं नाही. लडखडणाऱ्या टीम इंडियाला रोहित शर्माने आधार दिला.
4/ 5


रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एक हजार रन करणारा अजिंक्य रहाणेनंतरचा दुसरा बॅट्समन बनला आहे.