

ऋषभ पंतने (Rishabh Pant) अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा सिद्ध केलं, की तो जगातला सगळ्यात धोकादायक बॅट्समन का आहे. अहमदाबादच्या ज्या खेळपट्टीवर रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना रन करताना अडचणींचा सामना करावा लागत होता, तिकडे पंतने शतक ठोकलं. पंतने 88 बॉलमध्ये पहिले त्याचं अर्धशतक पूर्ण केलं, यानंतर तो 115 बॉलमध्येच शतकापर्यंत पोहोचला. पंतचं टेस्ट करियरमधलं हे तिसरं शतक होतं. याचसोबत त्याने एक रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केलं.


ऋषभ पंत भारताचा पहिला आणि जगातला दुसराच विकेट कीपर आहे, ज्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतात टेस्ट क्रिकेटमध्ये शतक केलं. हे रेकॉर्ड आधी फक्त ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्टच्या नावावर होतं.


ऋषभ पंतने सिक्स मारत आपल्या करियरमधलं तिसरं शतक पूर्ण केलं. भारतातलं पंतचं हे पहिलंच शतक होतं. विशेष म्हणजे पंतने परदेशी जमिनीवरचं त्याचं पहिलं शतक इंग्लंडविरुद्धच केलं, तसंच त्या मॅचमध्येही त्याने सिक्स मारूनच शतकाला गवसणी घातली होती. (PTI)


ऋषभ पंतसाठी 2021 हे वर्ष उत्तम ठरत आहे. 6 इनिंगमध्ये त्याने 64.37 च्या सरासरीने 515 रन केले. यावर्षी सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पंतच्या पुढे फक्त इंग्लंडचा कर्णधार जो रूट आहे. जो रूटने यावर्षी 764 रन केले आहेत. (PIC: AP)