IND vs ENG : पुण्यातल्या विजयानंतर टीम इंडियाची पार्टी, हा खेळाडूने केलं Baby Sitting
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पहिल्या मॅचमध्ये झालेल्या विजयाचं सेलिब्रेशन केलं.
|
1/ 5
टेस्ट आणि टी-20 सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्येही विजय मिळवला. विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमने पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा 66 रननी पराभव केला.
2/ 5
आता दोन्ही टीममध्ये सीरिजची दुसरी वनडे 26 मार्चला खेळवली जाईल. त्याआधी टीम इंडियाने पहिल्या मॅचमध्ये झालेल्या विजयाचं सेलिब्रेशन केलं. युझवेंद्र चहलने याचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला.
3/ 5
चहलने हा फोटो शेयर केल्यानंतर केएल राहुलला ट्रोल करण्यात येत आहे. या फोटोमध्ये कॅप्टन कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि चहल दिसत आहेत. तर मागच्या बाजूला राहुलच्या बाळाला सांभाळताना दिसत आहे.
4/ 5
या फोटोमध्ये राहुल हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्यला कडेवर घेऊन उभा आहे. राहुल हार्दिक पांड्याच्या मुलासाठी किपिंग करत असल्याच्या कमेंट काहींनी केल्या.
5/ 5
ऋषभ पंत यानेही आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून टीमच्या पार्टीचा फोटो शेयर केला.