

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-इंग्लंडमध्ये सुरू असलेली तिसरी टेस्ट इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोसाठी खराब स्वप्नच ठरली. बेयरस्टोला तिसऱ्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये एकही रन करता आली नाही. दोन्ही इनिंगमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला. दोन्ही वेळा अक्षर पटेलनेच त्याची विकेट घेतली. दोन्ही वेळा बेयरस्टो बोल्ड झाला.


जॉनी बेयरस्टो भारताविरुद्ध पहिल्यांदाच एवढा खराब खेळला नाही. भारताविरुद्धच्या मागच्या 7 इनिंगपैकी 5 वेळा बेयरस्टोला खातंही उघडता आलं नाही. मागच्या 5 इनिंगमध्ये बेयरस्टोने फक्त 18 रन केले आहेत, यात 4 वेळा तो शून्यवर आऊट झाला. (Jony Bairstow Instagram)


बेयरस्टोने टेस्ट क्रिकेटमध्ये 34.45 च्या सरासरीने रन केले आहेत. तर भारताविरुद्ध त्याची सरासरी फक्त 29.55 एवढी आहे. भारताविरुद्ध बेयरस्टोला शतक करता आलेलं नाही. (Jony Bairstow Instagram)