इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) लाजिरवाणा पराभव झाला. चौथ्या दिवशी टीम इंडियाचा 278 रनवर ऑल आऊट झाला आणि भारताने ही मॅच इनिंग आणि 76 रनने गमावली. तिसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाने 215/2 अशी केली होती, पण 63 रनमध्ये उरलेल्या 8 विकेट गेल्या. पुजारा, विराट, रहाणे आणि ऋषभ पंत ही टीम इंडियाची मधली फळी इंग्लंडच्या बॉलिंगसमोर कोसळली. आता 5 टेस्ट मॅचची ही सीरिज 1-1 ने बरोबरीत आहेत. टीम इंडियाच्या या पराभवाला त्यांच्याच चुका जबाबदार आहेत.
खराब शॉट सिलेक्शन- भारतीय टीमची बॅटिंग इंग्लंडपेक्षा खूप जास्त अनुभवी आहे, पण तरीही खेळाडूंना या अनुभवाचा फायदा उचलता आला नाही. भारताचे हे अनुभवी बॅट्समन लीड्समध्ये सपशेल अपयशी ठरले. विराट (Virat Kohli), पुजारा, (Cheteshwar Pujara) राहुल, रहाणे (Ajinkya Rahane) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचं शॉट सिलेक्शन खराब होतं.
अंडरसन-रॉबिनसनची भेदक बॉलिंग- स्टुअर्ट ब्रॉड सीरिजमधून बाहेर झाला असला तरी ओली रॉबिनसनने त्याची कमी जाणवू दिली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये रॉबिनसनने (Ollie Robinson) भारताच्या 5 विकेट घेतल्या. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्यासारख्या बॅट्समनचा समावेश आहे. तर पहिल्या इनिंगमध्ये जेम्स अंडरसनने (James Anderson) फक्त 6 रनमध्येच भारताच्या सुरुवातीच्या 3 बॅट्समनना आऊट केलं.