मुंबई, 11 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट गुरुवारपासून लॉर्ड्सवर सुरु होणार आहे. लॉर्ड्सचं ऐतिहासिक मैदान टीम इंडियाच्या बॅट्समनसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर हे दिग्गज लॉर्ड्सवर फार यशस्वी झालेले नाहीत. विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांचीही अशीच अवस्था आहे. टीम इंडियातील प्रमुख बॅट्समनची लॉर्ड्सवरील कामगिरी कशी आहे पाहूया (फोटो : AP)